तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!; गुलाबराव पाटील यांचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र

| Updated on: Apr 04, 2023 | 7:12 AM

Gulabrao Patil on Mahavikas Aghadi : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तीन जणांची माय आणि खाटल्यावर जीव जाय!, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. विकासाचं व्हिजन असावं लागतं. तीन वेगवेगळ्या विचारांचे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर त्यांच्याकडे विकास येईल कुठून? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावलाय. कुणी काँग्रेसचा, एक काँग्रेसमधून फुटलेली राष्ट्रवादी, एक शिवसेना… ज्यांची विचारधाराच एक नाही त्यांच्या डोक्यात विकास येऊ शकत नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

Published on: Apr 04, 2023 07:12 AM
Special Report | संभाजीनगरच्या सभेला नाना पटोले गैरहजर अन् म्हणाले, माझ्यामुळेच इतरांची…
छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीमागे पीएफआयचा हात? भाजप खासदारच्या वक्तव्याने चर्चा