अरे मिंध्या पाहिले आम्ही दिलेलं मत वापस कर मग माझ्यावर टीका कर; गुलाबराव पाटील यांचं संजय राऊतांवर टीकास्त्र
Gulabrao Patil on Sanjay Raut : महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरेचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पाहा त्यानी नेमकं काय म्हटलंय...
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना माझ्यावरती टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. ज्या झाडाला फळ आहेत. त्यालाच दगड मारला जातो. राऊतला माहिती आहे मला फळ आहेत. म्हणून ते माझ्यावर टीका करतात, असं गुलाबराव पाटील म्हणालेत. अरे मिंध्या पाहिले आम्ही दिलेलं मत परत कर. मग गुलाबराव पाटलावर टीका कर. नाही तर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारेल, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
Published on: Mar 27, 2023 09:36 AM