बाळासाहेब तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही!; शिवसेनेच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल
Gulabrao Patil on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांची काल खेडमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.पाहा...
जळगाव : उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उद्धव ठाकरेंवर बरसले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमची स्वतःची प्रॉपर्टी नाही, असं गुबालराव पाटील म्हणाले आहेत. बाळासाहेबांचं नाव वापरू नका, हे पाचव्या-सहाव्या वेळेस सांगून झालंय. महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. बाळासाहेब हे उद्धव ठाकरे यांची स्वतःची प्रॉपर्टी नाही. मान्य आहे ते त्यांचे वडील आहेत. पण ते या देशाची आणि हिंदू समाजाची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे त्यांचं नाव कुणीही वापरेल, असं गुलाबराव पाटील म्हणालेत.