गिरीश महाजन यांना खडसे नावाचा कावीळ झालीये; एकनाथ खडसे भडकले

| Updated on: Mar 29, 2023 | 12:23 PM

Eknath Khadse on Girish Mahajan : जो कोणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे मात्र सत्तेचा माज यांना आला आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. पाहा संपूर्ण व्हीडिओ...

मुक्ताईनगर, जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याचे ग्रामविकास आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. गिरीश महाजन यांना खडसे नावाचा कावीळ झाली आहे. महाजनांना दिवस-रात्र फक्त एकनाथ खडसेच दिसतात, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात मंदाकिनी खडसे आणि संचालकांवर दूध फेडरेशन गैरव्यवहारबाबत गुन्हे दाखल होणार असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दूध फेडरेशनमध्ये जर गैरव्यवहार असेल तर मी स्वतःच या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. मात्र मी केलेल्या तक्रारीची राजकीय दबावापोटी पोलिसात नोंद झालेली नाही, असंही खडसेंनी यावेळी सांगितलं.

Published on: Mar 29, 2023 12:20 PM
सावरकर विषयावर दोनच वाक्यात संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले, पुढे पाहू
बदला घेण्यासाठी अदानीच्या मागे का उभे आहात?; संजय राऊत यांचा सवाल