“अजितदादा सोबत आले तर, अमर अकबर अँथनी पिक्चर चांगला चालेल”

| Updated on: Apr 18, 2023 | 11:09 AM

Gulabrao Patil on Ajit Pawar : अजित पवार भाजपत जाण्याच्या चर्चांवर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा व्हीडिओ...

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे महायुतीच्या बाजूने जातील, अशी जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. हवामानाचा अंदाज असा दिसतोय की राष्ट्रवादीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचा जोरदार पाऊस पडेल असं दिसतंय, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. अजित पवार आता थांबणार नाहीत, असंही ते यावेळी म्हणाले. अजित पवार हे डॅशिंग नेते आहेत. कोणताही निर्णय घेताना ते घाबरणार नाहीत. अजित पवार आमच्यासोबत आले तर अमर अकबर अँथनी पिक्चर चांगला चालेल, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Published on: Apr 18, 2023 10:29 AM
पहाटेच्या शपथविधीला अजितदादा गेले होते तो पक्षाचा निर्णय होता; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र कायम, मृत्यूचं एकच मोठं कारण आलं समोर; बघा कोणतं