शेतकऱ्याने तक्रार केली, गुलाबराव पाटलांनी त्याच्याच गाडीवर बसून शेत गाठलं अन् निकाल लावला…
एका शेतकऱ्याने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. तक्रारीनंतर त्याच शेतकऱ्याच्या गाडीवर बसून गुलाबराव पाटील शेतात गेले. पाहा व्हीडिओ...
जळगाव : एका शेतकऱ्याने पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. तक्रारीनंतर लगोलग तोडगा काढण्यात यावा, यासाठी त्याच शेतकऱ्याच्या गाडीवर बसून गुलाबराव पाटील शेतात गेले. धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक गावातील शेतकऱ्यांने मक्याची वाढ न झाल्याने नुकसान होत असल्याची तक्रार केली. तक्रार करताच गुलाबराव पाटलांनी शेतकऱ्याच्या दुचाकीवरून शेतात जात पाहणी केली. पाहणी करून गुलाबराव पाटलांनी लगेचच कृषी अधिकाऱ्यांना पंचनामाचे करण्याचे आदेश दिले.