बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्राला ही भाषा...; रावसाहेब दानवे यांचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्राला ही भाषा…; रावसाहेब दानवे यांचं उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

| Updated on: Apr 06, 2023 | 10:05 AM

Raosaheb Danve on Uddhav Thackeray : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

जालना : उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी निषेध केला आहे. “मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी ही लेव्हल गाठणं म्हणजे कठीण आहे. बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्राला ही भाषा शोभत नाही. त्यांनी आपला दर्जा राखला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली आहे. जालन्यात भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा या यात्रेत रावसाहेब दानवे सहभागी झाले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Published on: Apr 06, 2023 10:05 AM
चंद्रकांत खैरे हनुमानाच्या चरणी, उद्धव ठाकरे यांच्यासाठी नेमकं काय साकडं घातलं?
Video : भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी