ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार, जरांगे पाटील याचं वक्तव्य
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला होता. आता विधानसभा निवडणूकीत मनोज जरांगे आपले उमेदवार उभे करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी जरांगे यांनी समाज बांधवांची बैठक बोलावली आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. वेळ पडली तर मराठे भाजपचा एन्काउंटर राजकीय एन्काऊंटर करणार असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवासाठी 20 नोव्हेंबर रोजी बैठक ठेवली आहे. या बैठकीत पाडापाडी करायची की उमेदवारांना उभे करायचं याचा निर्णय घेतला असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या राज्यात कोणीच समाधानी नाही. मराठे, दलित,मुस्लीम, ओबीसी कोणीचे सुखी नाही. ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम लावणार आहे. या मन:स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना जायला भाग पाडले. जो समाज त्यांच्या बाजूने होता त्यांचे मुडदे फडवणीस यांनी पाडली. देशातील सर्वात डागी माणूस आणि देशात पहिला आहे. न्यायाची अपेक्षा फडवणीस यांच्याकडून होती, पण त्यांनी आमच्या नरड्यात विष ओतले असेही जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांची नुकतीच अनेक नेत्यांनी भेट देखील घेतली आहे.