Video | ‘नारायण राणेंना अटक केली, तर जरांगेंना…,’ काय म्हणाले प्रवीण दरेकर

| Updated on: Feb 27, 2024 | 4:25 PM

मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच थेट आरोप केला. त्यामुळे सरकारने आता या प्रकरणात मनोज जरांगे राजकारणी झाल्याची टीका केली. ते विरोधकांची भाषा बोलत असल्याने त्यांचा बोलविता धनी कोण यावरुन अधिवेशनात भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी थेट मागणी केली की...

मुंबई | 27 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकेरी भाषेत शिवीगाळ केल्याने त्यांच्या बोलविता धनी कोण यावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात विधानसभेत आज आरोप प्रत्यारोप झाले. जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या संगीता वानखेडे यांनी या प्रकरणात रोहीत पवार आणि राजेश टोपे यांच्यावर मदत पुरविल्याचे आरोप केले आहेत. हाच धागा पकडत भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक केली जावी आणि त्यांची नार्को एनालिस टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Published on: Feb 27, 2024 04:24 PM
WITT Global Summit : काश्मीरमध्ये पूर्वी शांतता विकत घेतली होती, मात्र आता तिथे… मनोज सिन्हा
WITT Global Summit : कॉन्ट्रोव्हर्सीला कसं तोंड देतो ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’आमिर खान?