अजित पवार यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी, जयंत पाटील म्हणतात, “नोशनलिस्ट पार्टीला…”

| Updated on: Jul 04, 2023 | 2:39 PM

अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केली आहे. नव्या नेमणुका जाहीर करून मूळ राष्ट्रवादी पक्षाला आव्हान देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पहिलं लक्ष्य जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना केलं आहे. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदावरून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलं. सुनील तटकरे यांची या पदावर नियुक्ती केली आहे. नव्या नेमणुका जाहीर करून मूळ राष्ट्रवादी पक्षाला आव्हान देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, “आमची ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी’ आहे. महाराष्ट्रात अलीकडे नवीन झालीय, ती ‘नोशनलिस्ट काँग्रेस पार्टी’ आहे. नोशनल पार्टीने मला निलंबित केलं काय, ठेवलं काय. मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे.”

Published on: Jul 04, 2023 02:39 PM
‘प्रफुल्ल पटेल भाजपच्या स्क्रिप्टवर बोलतात’; नाना पटोले यांचा मिश्किल टोला
प्राजक्त तनपुरे यांचा पाठिंबा कोणाला? अजित पवार यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण