“एकनाथ शिंदे यांना पर्याय म्हणून अजित पवार, शिंदेंनी विचारा करावा”, जयंत पाटील यांचा सल्ला
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र आता अजित पवार भाजपसोबत आल्याने शिंदे गट अडचणीत सापडला आहे. अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही बंडखोरी केली असा दावा शिंदे गटाने केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या 30 आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र आता अजित पवार भाजपसोबत आल्याने शिंदे गट अडचणीत सापडला आहे. अजित पवार निधी देत नाहीत, म्हणून आम्ही बंडखोरी केली असा दावा शिंदे गटाने केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, “मला आता शिंदेंची काळजी वाटत आहे, कारण आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गेले त्यामुळे भाजपची राज्यात सत्ता आली, शिंदे जाताना 40 आमदार घेऊन गेले होते आता पवार किती आमदार घेऊन जातात हे दोन ते तीन दिवसात समोर येईलच. मात्र, शिंदेंना हा पर्याय शोधण्याचा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे त्यांनी याबाबत विचार करायला हवा.”