Jayant Patil: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोंधळलेले- जयंत पाटील
सरकार स्थापनेच्याच गडबडीत अडकले असल्यामुळे राज्याच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर वेगळी परिस्थिती असती.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाला होत असलेल्या विलंबावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोंधळले असून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केले असते तर योग्य झाले असते असे पाटील म्हणाले. महाराष्ट्र हे देशातील इतर राज्यांशी स्पर्धा करणारे राज्य आहे. अशा राजकीय गोंधळामुळे राज्याची प्रगती खुंटते असेही जयंत पाटील म्हणाले. सरकार स्थापनेच्याच गडबडीत अडकले असल्यामुळे राज्याच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर वेगळी परिस्थिती असती. भाजपने असा निर्णय का घेतला हे कळण्यापलीकडे असल्याचेही पाटील म्हणाले.
Published on: Aug 13, 2022 09:51 AM