Special Report : अजित पवार गटाची खेळी? पवार यांच्या भेटीमागे कोणता गेम? जयंत पाटील म्हणतात, ‘दिलगिरी’
त्यावेळी ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार हे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.
मुंबई, 17 जुलै 2023 | राष्ट्रवादी काँग्रेसतील बंडखोरीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वीच सिल्व्हर ओकवर जात अनेकांना धक्का दिला होता. त्यावेळी ते राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार हे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्यानंतर अजित पवार यांच्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. तर या चर्चा शांत होतात न होतात तेच पुन्हा एकदा अजित पवार आणि पवार गट थेट शरद पवार यांच्या भेटीला पोहचला. त्यावरूनही राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यावेळी अजित पवार गटाकडून कोणतीही माहिती शरद पवार यांना न देता त्यांची भेट घेतली. तर अजित पवार गटाने थेट शरद पवार गटालाच ऑफर दिल्याचे बोलले जात आहे. यावरून शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या भेटीमागचे कारण स्पष्ट सांगताना अजित पवार गटाकडून बंडखोरीबाबत शरद पवारांसमोर दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचा दावा केला आहे. यावरून सध्या अनेक अर्थ काढले जात आहे. अजित पवार गट आणि शरद पवार यांच्या भेटीवर हा स्पेशल रिपोर्ट