शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणी केला आरोप

| Updated on: Sep 07, 2024 | 6:38 PM

गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याला नालायक म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत बेबनाव सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर आता अजितदादांना बाहेर काढण्याचा शिंदे गटाचा प्लान असल्याचा आरोप एका बड्या नेत्याने केला आहे.

गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्याला नालायक म्हटले आहे. त्यामुळे अजितदादा यांच्याकडे अर्थ खाते असल्याने अशा प्रकारची थेट टिका एखाद्या मंत्र्‍यावर होत असेल तर महायुतीत काही आलबेल चालू आहे असे म्हणता येत नाही. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रसचे नेते जयंत पाटील यांनी महायुतीतून अजितदादांना बाहेर काढण्याचा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. कारण अजितदादा असल्याने त्यांना केवळ 60 जागा लढवायला मिळणार आहेत. जर अजितदादा नसतील भाजपाच्या बरोबरीच्या जागा लढविण्याची संधी एकनाथ शिंदे गटाला मिळणार आहे असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 07, 2024 06:37 PM