अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण, जयंत पाटील यांची टीका…
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषण केलं. त्यावर जयंत पाटील यांनी टीका केली आहे.
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषण केलं. यात त्यांनी मोदी सरकारच्या काळातील चांगली कामं सांगितली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केलीय. मोदीमुळे देशातील भ्रष्टाचार कमी झाला, असं राष्ट्रपती म्हणाल्या. अलीकडचे काही दाखले दिले तर कळेल की भ्रष्टाचार कमी झाला की नाही. असं जयंत पाटील म्हणाले. निवडणुकीत धनशक्तीचा वापर झाला, अशी माहिती आहे. तरीही जास्तीत जास्त आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास असल्याचं जयंत पाटील म्हणालेत.
Published on: Jan 31, 2023 03:18 PM