भाजपमध्ये पंकजा मुंडे नाराज? जयंत पाटील म्हणतात…

| Updated on: Jun 01, 2023 | 3:04 PM

"भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे", असं पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर: “भाजप माझा थोडी आहे. मी भाजपात आहे”, असं पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या कालच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपचा अलीकडे हाच प्रॉब्लेम झाला आहे. अनेक लोकं राष्ट्रवादीतून गेलेत, त्यामुळे निष्ठावंतांना कुठे बसवायचं आणि नव्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून तिथं गेलेल्या लोकांना कुठं बसवायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न जरी असला, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदे गटातून भाजपतं जी लोकं गेलीत, या सगळ्यांच्या ओझ्याखाली निष्ठावंत मागे ढकलले गेले आहेत, ती अस्वस्थता भाजपमध्ये नक्की आहे”, असे जयंत पाटील म्हणाले.

 

Published on: Jun 01, 2023 02:46 PM
“ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी
Maharashtra Board SSC Result 2023 Date : गुलाल, पेढे तयार ठेवा! उद्याच लागणार दहावीचा रिझल्ट; कुठे आणि कसा पाहू शकता निकाल?