पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीत जयंत पाटलांना आठवलं शरद पवाराचं पावसातलं भाषण; म्हणाले…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पावसातील सभेचा संदर्भ दिला. पाहा...
पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पावसातील सभेचा संदर्भ दिला. “शरद पवारांच्या पावसातील सभेमुळं अनेकांची मतं वाढली. काँग्रेस असो वा पुरस्कृत उमेदवार असो त्यांचा ही फायदा झाला”, असं जयंत पाटील म्हणालेत. “नाना काटे विजयी होऊ नयेत म्हणून भाजपाने तिसरा माणूस उभा केला आहे. तो मतं खातोय म्हणून त्यांनी हा उमेदवार दिला आहे. तुम्ही, तुमचं मत नाना काटे यांनाच द्या, जेणे करून मतदारसंघातील कामं होतील, असं जयंत पाटील म्हणालेत.
Published on: Feb 21, 2023 09:56 AM