‘नार्वेकर आपले जावई, आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास, ते लवकरच सोक्षमोक्ष लावतील’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा टोला
निकाल रिझनेबल टाईममध्ये म्हणजेच ठराविक वेळेत देण्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. तर या सर्व बाजू समजूनच हा निकाल दिला जाईल, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना नार्वेकर यांना टोला लगावला आहे.
पुणे : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. हा निकाल रिझनेबल टाईममध्ये म्हणजेच ठराविक वेळेत देण्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. तर या सर्व बाजू समजूनच हा निकाल दिला जाईल, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना नार्वेकर यांना टोला लगावला आहे. ‘नार्वेकर आमचे जावई आहेत, ते तसे करणार नाही, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे,असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे आता राहुल नार्वेकर कधी आणि काय निर्णय घेतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
Published on: May 19, 2023 09:34 AM