शेतकऱ्यांच्या आत्महत्याची टिंगल टवाळी करणाऱ्यांना…; आव्हाडांची शिंदेच्या मंत्र्यांवर टीका
सत्तार यांना त्या घरच्या वेदना काय कळणार ज्या घरचा करता पुरूष, एखादा भाऊ आत्महत्या करतो तेव्हा ते घर उध्वस्त होतं
मुंबई : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहतात. त्यांच्या शेतकऱ्यांच्यासंदर्भात एका विधानाने सध्या सभागृहात आणि राज्यात देखील राजकारण चांगले तापलेलं आहे. सत्तार यांनी, शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. त्यावर विरोधी पक्षांनी चांगलीच राळ उडवून दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आज अधिवेशन सुरू असताना सभागृहाबाहेर यावर प्रतिक्रिया देताना सत्तार यांच्यावर टीका केली. सत्तार यांना त्या घरच्या वेदना काय कळणार ज्या घरचा करता पुरूष, एखादा भाऊ आत्महत्या करतो तेव्हा ते घर उध्वस्त होतं. हे संवेदनाहीन झालेले हे एक सरकार आहे. तर सत्तार हे या सरकारचे मंत्री. बेशरमपणाने तिथे जाऊन म्हणतात, हे तर नेहमीच होतं, यात काय वेगळं आहे. लाज, लज्जा, शरम काहीच नसलेली ही लोकं शेतकऱ्यांच्या मृत्यूची टिंगल टवाळी करून त्यांचा असंवेदनशील महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणत आहेत