जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ यांना ईडीच्या अटकेची भीती ? जयंत पाटील म्हणाले, १५ वर्षांपूर्वी काही गोष्टी…
अनिल देशमुख यांना सोडण्यात आले तेव्हा न्यायाधीशांनी काय रिमार्क दिले ते पाहिले तर या सर्वच अटक चुकीच्या पद्धतीने झाल्या हे लक्षात येते. या अटक कशा जुळवून आणल्या होत्या हे लक्षात येते.
मुंबई : टीव्ही 9 मराठी’ने दादरच्या वीर सावरकर स्मारकात महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ या नेत्यांवर ईडीची कारवाई होऊ शकते असा थेट प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, ईडीची भीती वाटत नाही. कारण, कोणतेही कारण देऊन कुणालाही अटक करण्यात येत आहे. अनिल देशमुख यांना सोडण्यात आले तेव्हा न्यायाधीशांनी काय रिमार्क दिले ते पाहिले तर या सर्वच अटक चुकीच्या पद्धतीने झाल्या हे लक्षात येते. या अटक कशा जुळवून आणल्या होत्या हे लक्षात येते. आताही तेच करणार असतील तर अडचण होऊ शकते. सरकारविरोधी बोलणाऱ्यांवर रेड टाकली जाते. अन्य कुणावर रेड टाकली जात नाही. १५ वर्षांपूर्वी काही गोष्टी घडल्या असतील. पण, आपल्याकडे कायदे नेहमी बदलत असतात त्यावरून दहा बारा वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींवरून आता कारवाई करणे कितपत योग्य आहे. जर काही फायनान्शील चुक असेल तर आयकर कट आहे. पण थेट एडीची कारवाई करून छळले जात आहे. लोकांना हे आता समजले आहे त्यामुळे भाजपची लोकप्रियता घसरत चालली आहे. विरोधकांना नामोहरम करण्यापेक्षा निवडणुकीत जाऊन सांगितले तर लोकच त्याचा निकाल लावतील, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.