“कर्तृत्ववान मुलगा आपल्या म्हाताऱ्या बापाला नेहमी …”, जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांच्यावर पलटवार

| Updated on: Jul 06, 2023 | 9:16 AM

कालच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचा तो ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख करत टीका केली. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई: कालच्या मेळाव्यात अजित पवार यांनी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवारांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचा तो ठाण्याचा पठ्ठ्या असा उल्लेख करत टीका केली. त्याच्यामुळे गणेश नाईक, संदीप नाईक, सुभाष भोईल, निरंजन डावखरे हे आपला पक्ष सोडून केले. इतक नाही तर मागे वसंत डावखरे मला म्हणाले, साहेब का म्हणून याला मोठ करतात, असं अजित पवार म्हणाले. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गणेश नाईक का गेले हे एकदा शरद पवारांना विचारा, माझ्यासारख्या शुद्राचे नाव त्यांच्या तोंडात यावे हे माझे भाग्य आहे. धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी नाही म्हटलेले, त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन शपथ घेऊन सांगावे. मला कोणाचे घर फोडण्यात रस नाही, हे योग्य नाही असे शरद पवार म्हणाले होते. तेव्हा धनंजय मुंडे मला यायचेच आहे, मला यायचेच आहे असे सांगत राहिले, खोटं बोलून शरद पवार यांना बदनाम करू नका. तुम्हाला माझ्याबद्दल जे काही बोलायचं आहे, ते तुम्ही बोला. लोकशाहीमध्ये तुम्हाला तो अधिकार आहे. पण जो कर्तृत्ववान मुलगा असतो, तो आपल्या म्हाताऱ्या बापाला नेहमी सांगतो, तुम्ही काम करत राहा. पण तुम्ही तर सगळे मिळून त्यांना निरोपच देत आहात. घरी बसायला सांगत आहात, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

Published on: Jul 06, 2023 09:16 AM
राष्ट्रवादीच्या बंडावर संजय राऊत यांची मोदी-शाहांवर टीका, म्हणाले, “कोंबड्या झुंजवून…”
शिंदे गटाबाबत जयंत पाटील यांचं मोठं विधान; म्हणाले, “40 आमदारांना परतीचे वेध…”