‘पुरोगामी विचारधारेची तळपती तलवार’; जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात बॅनरबाजी
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे.
ठाणे, 5 ऑगस्ट 2023 | राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. ‘ठाण्याचा पठ्ठ्या साहेबांशी निष्ठावान आहे, होता आणि मरेस्तोवर राहिल’…’पुरोगामी विचारधारेची तळपती तलवार’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. आव्हाड यांचा वाढदिवसानिमित्त आज गडकरी रंगायतन या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
Published on: Aug 05, 2023 11:01 AM