गद्दार शब्दाचा उल्लेख न करता जितेंद्र आव्हाड यांची अजित पवारांवर टीका; म्हणाले, “शब्द बदलू शकतात, पण…”

| Updated on: Jul 03, 2023 | 3:24 PM

अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाणे: अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शरद पवार आता बाहेर पडलेले आहेत,आमदारांना गर्दीची कल्पना नाही. बाजूला मकरंद पाटील आहेत चे कालपर्यंत अजित पवार यांच्या गटात होते ते आमच्या सोबत उपस्थित आहे. हळूहळू आमचे नेते परत येतील. लवकरच सगळं चित्र स्पष्ट होईल. अजून 24 तास झालेले नाहीत. एक-एक नेता परत यायला लागला आहे. अमोल कोल्हे यांनीही ट्विट करत आपण शरद पवार साहेबांसोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आमचा पहिला मोहरा परत..! शब्द बदलू शकतात, पण अर्थ बदलू शकत नाही…,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी गद्दार शब्दाचा उल्लेखही न करता अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Published on: Jul 03, 2023 03:24 PM
Maharashtra Politics: ‘त्यांची चूल विझली? आम्ही नवीन चुलं’, राऊत यांना शिंदे गटाच्या नेत्याचा टोला
Ajit Pawar News : अजित पवार यांच्यासह इतर 8 आमदारांबाबत जयंत पाटील याचं मोठं वक्तव्य, म्हणाले….