“देवेंद्र फडणवीसांच्या तोंडावर कोर्टाचा निकाल दिसतो”, कोणी केली टीका?
सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोहीम सुरु केली आहे. नागपूर येथील मविआ आयोजित व्याख्यानातून जितेंद्र आव्हाड यांनी निकालाचे विश्लेषण करून सांगितले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
नागपूर : सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोहीम सुरु केली आहे. नागपूर येथील मविआ आयोजित व्याख्यानातून जितेंद्र आव्हाड यांनी निकालाचे विश्लेषण करून सांगितले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. “देवेंद्र फडणवीस म्हणतात, आव्हाड यांना काही समजत नाही, पण मी निकाल योग्य समजून घेतला, निकाल हा फडणवीस यांच्या चेहऱ्यावरून दिसतो. आज जी जाहिरात आली त्यावरून आता फडणवीस यांना कळलं असेल, हे लोक कोणत्या राक्षसी प्रवृत्तीने प्रेरित आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Published on: Jun 14, 2023 09:18 AM