“शिवसेनेच्या जाहिरातीमागचं डोकं हे ठाण्यातलं”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट
शिवसेनेच्या जाहिरातीनंतर दोन दिवस राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं होत. भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.
ठाणे : शिवसेनेच्या जाहिरातीनंतर दोन दिवस राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं होत. भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र कालच्या सभेत या चर्चांना देवेंद्र फडणवीस यांनी फुल स्टॉप लावला. “एका जाहिरातीमुळे आमचं सरकार पडेल, इतकं तकलादू सरकार आमचं नाही”, असं फडणवीस म्हणाले. मात्र विरोधकांकडून या जाहिरातीमागचा खरा सूत्रधार कोण त्यांचं नाव समोर आणा अशी मागणी केली जातेय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. “ही जाहिरात दिली कोणी? ठाण्यातला कोणता कलाकार यामागे आहे? मी हींट दिली तुम्ही शोधून काढा”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Published on: Jun 16, 2023 08:50 AM