आव्हाड यांना धक्का, निकटवर्तीय असलेले हेमंत वाणी यांना तडीपारची नोटीस
याच्या आधी देखील आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अभिजित पवार यांनी देखील तडीपारची नोटीस बाजावण्यात आली आहे.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार गटाचे अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना धक्का देणारा निर्णय ठाणे पोलिसांकडून घेण्यात आला असून त्यांचे निकटवर्तीय असलेल्या हेमंत वाणी यांच्या नावे तडीपारची नोटीस बजावण्यात आली आहे. हेमंत वाणी हे जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय मानले जातात. तर ते येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील आहेत. हेमंत वाणी यांच्या तडीपारिची नोटीस ठाणे पोलीसांककडून काढली असून त्यांच्यावर राजकीय गुन्हे दाखल देखील दाखल करण्यात आले आहेत. तर याच्या आधी देखील आव्हाड यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अभिजित पवार यांनी देखील तडीपारची नोटीस बाजावण्यात आली आहे.
Published on: Jul 15, 2023 10:12 AM