जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानात असं काय सांगितलं की ते हसले? पाहा व्हिडीओ…
पावसाळी अधिवेसनावेळी सभागृहाबाहेर जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले अन् पुढे जे झालं त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई, 25 जुलै 2023 | अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. या दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवार गटाचे नेते भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडले. यात जितेंद्र आव्हाड देखील होते. मात्र पावसाळी अधिवेशनावेळी फार वेगळ चित्र पाहायला मिळालं. अधिवेशनावेळी सभागृहाबाहेर गर्दीत जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस समोरा-समोर आले अन् पुढे काय झालं तुम्हीच पाहा..
Published on: Jul 25, 2023 09:38 AM