“मला फडणवीसांबद्दल वाईट वाटतंय”, शिवसेनेच्या जाहिरातीवरून राष्ट्रवादीची टीका

| Updated on: Jun 14, 2023 | 12:19 PM

Jitendra Awhad, Devendra Fadnavis, BJP, Shivsena, Cm Eknath Shinde, जितेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस, भाजप, शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : शिवसेनेच्या जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर उपरोधात्मक टोला लगावला आहे. “शिवसेनेच्या जाहिरातीच विश्लेषण करताना मला माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अतिशय वाईट वाटत आहे. आज त्यांना कळलं असेल या माणसाची राक्षसी महत्वाकांक्षी किती आहे. महाराष्ट्राच्या नकाशावर देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुसण्याचा प्रयत्न झाला पण ते होणार नाही. पण ते किती राक्षसी महत्वाकांक्षी आहेत हे आज फडणवीस आणि भाजपला कळलं असेल. खांद्यावर पाय ठेवायचा आणि डोक्यावर जायचं, असा हा प्रकार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. “तसेच सामान्य माणसांच्या घरात जा आणि ते काय म्हणतात ते बघा. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे सगळे मिळून एकत्र लढले तर 200 जागांच्या खाली येतच नाही. शिंदेंना सोबत घेऊन भाजपने स्वतःचं सर्वात मोठं नुकसान केलं आहे”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Published on: Jun 14, 2023 12:18 PM
VIDEO | नवीन जाहिरातीवरून सुप्रिया सुळे यांचा शिंदे यांना टोला, म्हणाल्या, ‘कोणी तरी डोस…’
नाराजीनंतर आजच्या शिवसेनेच्या जाहिरातीवर संजय राऊत म्हणाले, ‘फडणवीस यांनी बांबू…’