“राज ठाकरे हे भीमसेन जोशी, ते वेगवेगळे सूर लावत असतात”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची टीका

| Updated on: May 31, 2023 | 8:31 AM

सोमवारी रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीनंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाणे: सोमवारी रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. या भेटीनंतर विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे हे भीमसेन जोशी आहेत. ते वेगवेगळे सूर लावत असतात, त्यामुळे त्यांचे असे वेगळे सूर पाहायला मिळतात आणि अशा भेटी पाहायला मिळतात”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच “शरद पवार हे अलर्ट राहणारे नेते आहेत. देशाची परिस्थिती पाहिली तर देशात कधीही निवडणुका लागण्याची शक्यता आहे, यासाठी तयारीला लागलं पाहिजे या हेतूने शरद पवार आता मैदानात उतरले आहेत,” असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Published on: May 31, 2023 08:31 AM
गौतमी पाटील हिने मानले पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार, म्हणाली…
‘… तू होते का माझी परी?’, गौतमी पाटील हिला पत्र लिहून पठ्ठ्यानं केली थेट लग्नाची मागणी