“ते राज्यापाल मविआ सरकार पाडण्यासाठीच महाराष्ट्रात आलेले”, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

| Updated on: Jun 14, 2023 | 9:09 AM

सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोहीम सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने 'चला या...मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया', या टॅगलाईन खाली ही मोहीम सुरु केली आहे. नागपूर येथील मविआ आयोजित व्याख्यानातून जितेंद्र आव्हाड यांनी निकालाचे विश्लेषण करून सांगितले.

नागपूर : सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोहीम सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने ‘चला या…मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया’, या टॅगलाईन खाली ही मोहीम सुरु केली आहे. नागपूर येथील मविआ आयोजित व्याख्यानातून जितेंद्र आव्हाड यांनी निकालाचे विश्लेषण करून सांगितले. यावेळी त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “हा निकाल देशाच्या राजकारणावर दुरगंभीर परिणाम करणारा आहे. सर्वोच्च न्यायालयात पाच पिटीशन होत्या ,त्याचा निकाल पाच पानात एकत्रित रित्या दिला आहे. व्हीप सुनील प्रभूचा लागू होणार म्हटल्यानंतर भरत गोगावले आणि एकनाथ शिंदे यांचा निर्णय लागू होऊ शकत नाही. तुटलेल्या गटाला मान्यता स्पीकरला देता येत नाही, कारण कॉन्स्टिट्युशन हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होत. स्पीकरला एक चौकट आखून दिली, त्यात स्पीकरला निर्णय घ्यायचा आहे. एक असंविधानिक सरकार आपल्या डोक्यावर बसलं आहे ते कायदा मानत नाही. महाराष्ट्रात राजकीय नैतिकता होती, त्यामुळे अनेक घटना घडतात मोठं-मोठया नेत्यांनी राजीनामे दिले आणि तेच उद्धव ठाकरे यांनी केलं त्यांच्याकडे नैतिकता होती म्हणून त्यांनी राजीनामा दिला. तसेच राज्यपाल हे सरकार पाडण्यासाठीच आणले होते.”

Published on: Jun 14, 2023 09:09 AM
जाहिरातीचं आधी समर्थन आता यू-टर्न? शंभूराज देसाई म्हणतात, ‘महाराष्ट्रात आमचीच’
Special Report | शिर्डीतलं दान मुस्लिमांच्या झोळीत? व्हायरल व्हिडीओचा दावा खरा की खोटा?