शरद पवार यांच्या वयावरून नारायण राणे यांचा वार, तर जितेंद्र आव्हाड यांचा पलटवार, म्हणाले…
योद्धा कोणाला म्हणावं? याचीही काही व्याख्या आहे. आर्मीत घेताना 82 वर्षाच्या योद्ध्याला घेत नाहीत. योध्याला वय असतं, अशी टीका नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर केली. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे: अजित पवार यांनी बंडानंतर शरद पवार पुन्हा नव्या जोमाने सक्रीय झाले आहेत. ते महाराष्ट्र दौराही करणार आहेत. त्यामुळे 80 वर्षांचा योद्धा म्हणत शरद पवार यांच्या या उत्साहाचं शरद पवार गटाचे आणि मविआचे नेते कौतुक करत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. योद्धा कोणाला म्हणावं? याचीही काही व्याख्या आहे. आर्मीत घेताना 82 वर्षाच्या योद्ध्याला घेत नाहीत. योध्याला वय असतं, असं नारायण राणे म्हणाले. यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “योद्धा हा मनाने असतो, उदयभानला फाडणारे शेलार मामा हे फक्त 80 वर्षांचे होते. भर रणांगणामध्ये उदयभानाला असा उभा चिरला होता . ते काटक शेलार मामा ते फक्त 80 वर्षांचे होते. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. योद्धा हा वयावर ठरत नसतो.”
Published on: Jul 11, 2023 11:48 AM