जे. जे. च्या निवासी डॉक्टर अखेर परतले, पण त्यांचा राजीनामा घेऊनच
त्याच्याविरोधात गेल्या 4 दिवसांपासून निवासी डॉक्टर संपावर होते. आज त्यांनी आपला हा आंदोलन मागे घेतला आहे. डॉ. रागिणी पारेख आणि तात्याराव लहाने यांना पदावरून मुक्त करत राज्य शासनाने त्यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. त्यामुळे हा संप आता मागे घेण्यात आला आहे.
मुंबई : जे जे रुग्णालयातील डॉ. रागिणी पारेख आणि डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यासह 7 एक डॉक्टरांविरोधात निवसी डॉक्टरांनी दंड थोपाटले होते. त्याच्याविरोधात गेल्या 4 दिवसांपासून निवासी डॉक्टर संपावर होते. आज त्यांनी आपला हा आंदोलन मागे घेतला आहे. डॉ. रागिणी पारेख आणि तात्याराव लहाने यांना पदावरून मुक्त करत राज्य शासनाने त्यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. त्यामुळे हा संप आता मागे घेण्यात आला आहे. तर निवासी डॉक्टर यांच्या हुतांश मागण्या मान्य झाल्या असून उर्वरित मागण्या तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आज आम्ही संप मागे घेतोय, असंही निवासी डॉक्टरांनी म्हटलं आहे.
Published on: Jun 04, 2023 12:19 PM