VIDEO | ‘’तु रडल्या सारखं कर मी मारल्या सारखं करतो’ अशी तर त्यांची भूमिका नाही ना?’, कुणी घेतली शंका?
शरद पवार आणि अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त बैठकीमुळे अजूनही राजकारण धुमसतच आहे. याभेटीवरून आता देखील टीका होताना दिसत आहे. अशीच टीका पुन्हा एकदा करण्यात आली असून पवार यांच्याच भूमिकेवर शंका उपस्थित करण्यात आली आहे.
अहमदनगर : 19 ऑगस्ट 2023 | पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी नगरमध्ये माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना उंटावरून शेळ्या हाकल्या अशी टीका केली. त्याचदरम्यान कवाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेवर देखील शंका उपस्थित करत टीका केलीय. सध्या पवारांच्या भूमिकेवरून शंका येत आहे. ते ‘तु रडल्या सारखं कर, मी मारल्या सारखं करतो’ अशी भूमिका तर घेत नाही ना अशी शंका आम्हाला येतेय असं कवाडे यांनी म्हंटलय. तर 2014 मध्ये जेंव्हा भाजपचं सरकार आलं तेंव्हा न मागता पवार यांनी भाजपला पाठींबा दिला होता. पण आता त्यांचे निकटवर्तीय असणारे प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार हे वेगळे होऊन विद्यमान सरकारमध्ये जातात. राजकीय पेच निर्माण झाला असतानाही पवार त्यांना भेटीसाठी वेळ देतात. अशाने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. जर लोकांमध्ये स्वच्छ प्रतिमा ठेवायची असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. असं जोगेंद्र कवाडे यांनी म्हंटलंय.