नवाब मलिकांना दिलासा नाहीच; तुरूंगातला मुक्कामही 14 दिवसांनी वाढला
जमीन गौरव्यवहार प्रकरणात मलिक यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ते आता पर्यंत जामिन मिळेल याच्या प्रतिक्षेत होते.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज सुनावणी पार पडली. यावेळी त्यांना दिलासा मिळेल असे वाटत होते. मात्र त्यांचा तुरंगातला मुक्काम 14 दिवसांनी वाढवत न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला. यामुळे मलिक यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात मलिक यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर ते आता पर्यंत जामिन मिळेल याच्या प्रतिक्षेत होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत त्यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे
नवाब मलिक यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असली तरिही ते सध्या न्यायालयाच्या परवानगीने खासगी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर कुर्ल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Published on: Jan 06, 2023 04:01 PM