“सध्याचं राजकारण पाहता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जुळवून घ्यावं”, कोणी केली मागणी?

| Updated on: Jul 10, 2023 | 10:16 AM

उद्धव ठाकरे काल यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यापूर्वी महंत कबीरदास महाराज यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली.

वाशीम : उद्धव ठाकरे काल यवतमाळ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यापूर्वी महंत कबीरदास महाराज यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, “3 डिसेंबर 2018 ला देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे इथे आले होते. यावेळी प्रचंड असा जनसागर पाहायला मिळाला. ठाकरे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या विकासासाठी काम केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची धुरा सांभाळावी. सध्या जनता राजकारणाला कंटाळली आहे. कोणीतरी दोन पाऊले मागे यावे, अशी माझी इच्छा आहे.”

Published on: Jul 10, 2023 10:16 AM
राष्ट्रवादीच्या बंडानंतर सतेज पाटील यांती पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मविआची वज्रमूठ सभा आता…”
राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचार केला तर कारवाई का केली नाही? काँग्रेस नेत्याचा भापसह मोदींना सवाल