“विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळाल्याने धन्य झालो”, नगरच्या काळे दाम्पत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान
आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी गावातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे. भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत.
सोलापूर : आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी गावातील काळे दाम्पत्याला यंदा पूजेचा मान मिळाला आहे. भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे व्यवसायाने शेती करतात. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असं भाऊसाहेब काळे म्हणाले.
Published on: Jun 29, 2023 01:37 PM