VIDEO | उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना दिलासा; विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाची हजेरी

| Updated on: Jun 11, 2023 | 8:17 AM

राज्यात अजुनही मान्सूनची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा लोकांना सोसाव्या लागत आहेत. अशातच उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना मात्र पावसाने काहीशा दिलासा दिला.

नाशिक : जून महिन्याचा आता दुसरा आठवडाही संपत आला आहे. मिरगही सुरू झाला. पण राज्यात अजुनही मान्सूनची हजेरी लागलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा लोकांना सोसाव्या लागत आहेत. अशातच उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना मात्र पावसाने काहीशा दिलासा दिला. येथील कळवण, सुरगाणा घाट माथ्याला लागून असलेल्या भागाला पावसाने चांगलेच झोडपले. येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर अनेक ठिकाणीं झाडे उन्मळून पडली. तरी काही ठिकाणी घरांची छते देखील उडाली. कनाशी, अभोना, बोरगाव सह परिसरात पावसाने झोडपले.

Published on: Jun 11, 2023 08:17 AM
VIDEO | दिघे यांच्या मृत्यू की घातपात? शिवसेना नेत्याची चौकशीची मागणी; केदार दिघे यांचा पलटवार
‘अजित पवार यांना डावललं जातंय, त्यांनी योग्य भूमिका घ्यावी’, भाजप नेत्याचा नेमका सल्ला काय?