VIDEO : राम शिंदे यांनी गेमचं पल्टी केला; कर्जत समितीवर भाजपचा झेंडा लावत रोहित पवार यांना दे धक्का
कर्जत बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यावेळी रोहित पवार व राम शिंदे गटाच्या 9-9 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे रोहित पवार व राम शिंदे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर कोणाची सरशी होणार याकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं.
कर्जत : कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवडणूक पार पडल्या. यात भाजप नेते राम शिंदे यांच्या गटाने विजय मिळवत सभापती व उपसभापती अशी दोन्ही पदे खेचून नेली. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का दिला. कर्जत बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यावेळी रोहित पवार व राम शिंदे गटाच्या 9-9 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे रोहित पवार व राम शिंदे या दोन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर कोणाची सरशी होणार याकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं. मात्र शिंदे यांनी गेमचं पल्टी करत राष्ट्रवादीची मते फोडली आणि सभापती व उपसभापतीपदी भाजपचे उमेदवार निवडून आणले. या निवडणुकीत भाजपचे काकासाहेब तापकीर यांची सभापतीपदी तर अभय पाटील उपसभापती यांचा विजय झाला.
Published on: Jun 12, 2023 08:38 AM