कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री चेहरा कोण? सिद्धरामय्या की डीके शिवकुमार! निर्णय, दिल्ली घेणार

| Updated on: May 13, 2023 | 2:29 PM

काँग्रेसने पहिल्या कलांत 131 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने अवघ्या 66 जागांवर आघाडी घेतली आहे. जेडीएसने 21 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी 6 जागांवर आघाडी घेतली आहे.

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठीची मतमोजणी आता संपत आली आहे. पुढील दोन ते तीन तासात कर्नाटकचे सगळे चित्र स्पष्ट होईल आणि कोण कर्नाटकचा बाजीगर ठरेल हे ही सिद्ध होईल. तर तर मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. काँग्रेसने पहिल्या कलांत 131 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने अवघ्या 66 जागांवर आघाडी घेतली आहे. जेडीएसने 21 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी 6 जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलात काँग्रेसने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने कर्नाटकात किंगमेकर होण्याचं जेडीएसचं स्वप्न भंगलं आहे. त्यामुळे कर्नाटकात आता काँग्रेसचे सरकार येणार आहे. याच दरम्यान आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण अशाही चर्चांना उत आला आहे. तर कर्नाटकचा मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचे चेहरे समोर येत आहेत. यादरम्यान निकालातील बहुमताचा आकडा पाहता दिल्लीतून हालचाली वाढल्या आहेत. तर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी दिल्लीला बोलविण्यात आले आहे. त्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण याचा फैसला हा उद्याच दिल्लीत होणार. तर मुख्यमंत्री संदर्भात निर्णय घेण्यासाठी दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती देखील झाली आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

Published on: May 13, 2023 02:29 PM
तोडफोड करुन बाजूला करणं ही भाजपची संस्कृती, कर्नाटक निकालावरून कुणी केला हल्लाबोल?
‘बालिश वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही’, सामना अग्रलेखावरून कुणाचा संजय राऊत यांच्यावर पलटवार?