‘आमचा चेहरा बाळासाहेब आणि मोदीच’;’…हे कोण गद्दार?’ शिवसेना नेत्याची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
राज्यातही महाविकास आघाडीत राजकीय समीकरणांवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याचबोरबर त्यांच्यात असणारे मतभेद देखिल आता समोर येत आहेत.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. या विजयानंतर इतर राज्यातील विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातही महाविकास आघाडीत राजकीय समीकरणांवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याचबोरबर त्यांच्यात असणारे मतभेद देखिल आता समोर येत आहेत. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मविआसह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यानी कर्नाटक निवडणुकीचा पॅटर्न हा महाराष्ट्रात चालणार नाही. कारण जनता देशाचे प्रश्न आणि चेहरा पाहते. तर उद्धव ठाकरे हेच गद्दार आहे. ते आम्हाला गद्दार म्हणतात. कारण शिवसेनेचे विचार हे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचे नव्हते. तर ठाकरे यांचे आजचं कृत्य महाराष्ट्राला परवडणारं नाही असा घणाघात शिरसाट यांनी केला आहे.