काँग्रेस अध्यक्ष खरगेंची जीभ घसरली, पंतप्रधानांनी शिव्यांचा डाटाच काढला; म्हणाले, गाली का जवाब…

| Updated on: Apr 30, 2023 | 7:23 AM

पंतप्रधान मोदी यांनी हुमनाबादमध्ये जाहीर सभेत काँग्रेसवर टीका केली. तर राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार असा दावा केला. तर या निवडणुकीतही काँग्रेसने मला पुन्हा शिवीगाळ सुरू केली आहे.

मुंबई : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची (Karnataka Assembly Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांच्या बैठका आणि सभा होत आहेत. गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतचे स्टार या सभांमधून प्रचार करताना दिसत आहेत. तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप ही करताना दिसत आहेत. याचदरम्यान एका सभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आणि त्यांनी मोदी हे विषारी सापासारखे असल्याचं म्हटलं. त्यावरून आता जोरदार वाद रंगले आहेत. त्यानंतर भाजपकडून टीका सुरू असतानाच भाजपच्या एका आमदाराने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा उल्लेख विषकन्या असा केला. त्यामुळे हा वाद वाढतच गेला. त्यानंतर दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी यांनी हुमनाबादमध्ये जाहीर सभेत काँग्रेसवर टीका केली. तर राज्यात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होणार असा दावा केला. तर या निवडणुकीतही काँग्रेसने मला पुन्हा शिवीगाळ सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या लोकांनी मला 91 वेळा वेगवेगळ्या प्रकारे शिवीगाळ केली आहे. त्यामुळे या शिव्यांचा त्यांना मोबदला द्या. भाजपला सत्तेवर आणा असे आवाहन केलं आहे. पहा काय आहे कर्नाटकमधील हा शिव्यांचा खेळ. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 30, 2023 07:23 AM
संजय राऊतांनी बाप काढताच राणे खवळले, दिला इशारा, म्हणाले, दाखवाच
‘तोपर्यंत राजधानीत ‘दंगल सुरूच राहणार’, पैलवानांच्या आखाड्यात बाहुबली खासदार अडचणीत?