राऊतांनी दलाली सोडली तर मी येथे कशाला येऊ?; फडणवीस यांचा पलवार

| Updated on: May 04, 2023 | 12:01 PM

भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टारप्रचारक म्हणून कर्नाटक निवडणुकीत निवड झाली आहे. त्यामुळे तेथे प्रचारात गेले आहेत. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे देखील बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी गेले आहेत.

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) 10 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीतील भाजपसमोर काँग्रेसचे आव्हान आहे. तर महाराष्ट्रातील काही नेते ही आता त्यांच्या पक्षासाठी किंवा मित्र पक्षाच्या प्रचारासाठी कर्नाटकात गेले आहे. भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची स्टारप्रचारक म्हणून कर्नाटक निवडणुकीत निवड झाली आहे. त्यामुळे तेथे प्रचारात गेले आहेत. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे देखील बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी गेले आहेत. त्यांनी बेळगावमधील रोड शो वेळी भाजपवर टीकेच्या फैरी झाडल्या. त्यावरून फडणवीस यांनी पलवार केला आहे. यावेळी फडणवीस यांनी मराठी भाषकांच्या पाठिमागे मी आणि भाजप ठामपणे असल्याचे सांगत राऊत यांच्यावर टीका केली. राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी येथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी येथे येत आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा काँग्रेस संजय राऊतांचा मित्रपक्ष आहे. त्यांनी त्यांना सांगावं. मात्र काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मते कमी करण्यासाठी, काँग्रेसची दलाली करण्यासाठी राऊत याठिकाणी आले असा घणाघात केला आहे.

Published on: May 04, 2023 11:59 AM
केंद्रीय कायदामंत्री यांच्याशी बंद दाराआड चर्चा, भेटीत काय ठरलं? राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण
‘मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार कुचकामी ठरलंय’, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल