कर्नाटक प्रचारावरून शिंदे-फडणवीस यांच्यावर राऊत यांची पुन्हा सडकून टीका; म्हणाले, भाजपचा पराभव…

| Updated on: May 13, 2023 | 12:01 PM

काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण असून भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा सुपडा साफ होताना दिसत आहे.

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत आहेत. त्यात काँग्रेसला पूर्ण बहुमत प्राप्त होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण असून भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा सुपडा साफ होताना दिसत आहे. या निकालावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच डिवचलं आहे. त्यांनी, महाराष्ट्रासारख्या राज्यातून फौजाच्या फौजा पाठवल्या, लोक कमी खोके होते, पण लोकांनी खोके नाकारले. तिथे जागा पडाव्यात यासाठी फडणवीस आणि शिंदे यांनी पैशांचा महापूर आणला असा आरोप केला आहे. तर आपल्या लोकांना पाडण्यासाठी त्यांनी गद्दारी केली. मात्र तिथे सर्वांची मतं एक राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. प्रचारासाठी ते जिथे जिथे गेले तिथे भाजपचा पराभव झाला असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

Published on: May 13, 2023 12:01 PM
बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलांनीच घातला तुफान राडा, कुठं घडली घटना? बघा व्हिडीओ
Karnataka Election Result | काँग्रेसची घोडदौड सुरुच, भाजप-जेडीएसच्या जागा घटल्या; अंतिम विजय कुणाचा?