‘हे’ निकालावर बोलतायत हेच हास्यास्पद; नितेश राणेची संजय राऊत यांच्यांवर सडकून टीका, बावळट म्हणूनही केला उल्लेख

| Updated on: May 13, 2023 | 3:06 PM

त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. तसेच कर्नाटक निवडणुकीवर भाष्य केलं होतं.

सिंधुदुर्ग : कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर देशभराचं लक्ष लागून आहे. आतापर्यंतच्या मतमोजणी कलानुसार काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली होती. तसेच कर्नाटक निवडणुकीवर भाष्य केलं होतं. त्यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत राऊत यांचा समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी, कर्नाटक निवडणुकीचे निकाल दुपार पर्यंत लागतील असे सांगत राऊत यांचा बावळट असा उल्लेख केला आहे. तर ज्याने सरपंच पदाची ही साधी निवडणूक लढवली नाही तो आज कर्नाटक निवडणूक निकालावर भाष्य करतो आहे. हे हास्यास्पद असल्याचे म्हटलं आहे. तर ज्याला निवडणूक समजते, राजकारण समजते तो या बावळट संजय राऊत सारखा लगेच बोलणार नाही. असेही त्यांनी म्हटलं आहे. तर राज्यसभेच्या निवडणुकिवेळी ते कसे आमदारांचे पाया पडत होते हे ही आपण पाहील्याचं ते म्हणाले.

Published on: May 13, 2023 02:56 PM
‘बालिश वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही’, सामना अग्रलेखावरून कुणाचा संजय राऊत यांच्यावर पलटवार?
Karnataka Election Results 2023 : ‘बाळासाहेबांच्या शापामुळे भाजपचा पराभव’, ठाकरे गटाच्या नेत्याचा निशाणा