भाजपची आजची अवस्था ‘गिरा तो भी टांग उपर’; राष्ट्रवादी नेत्याची भाजपवर टीका

| Updated on: May 14, 2023 | 3:34 PM

कर्नाटक निवडणूक प्रचारावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना, हे पार्सल पॅक करून पाठवा मी बघतो काय करायचं असं म्हटलं होतं. त्यावरून आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाना साधला आहे.

जळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. भाजपचा दारूण पराभव करत काँग्रेस सत्तेवर आली आहे. मात्र कर्नाटक निवडणूक प्रचारावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना, हे पार्सल पॅक करून पाठवा मी बघतो काय करायचं असं म्हटलं होतं. त्यावरून आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाना साधला आहे. तर भाजप आणि जनसंघाचा इतिहास जर पाहिला तर भाजपाच्या जागाच निवडून येत नव्हत्या. तर त्यांना आजही दक्षिण भारतात स्थान नाही. मग हे पार्सल परत पाठवायचं का असा सवाल करत फडणवीस यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तर भाजपचा इतिहास पहा अनेक ठिकाणी डिपॉझिट गुल झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत असेही ते म्हणाले. तर अनेक राज्यात भारतीय जनता पार्टीची स्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची सध्यस्थिती ही गिरा तोभी टांग उपर अशी झाली आहे, अशी टीका केली आहे.

Published on: May 14, 2023 03:34 PM
राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल; ‘ते आवाहन’ पडलं महागात?
…जर धमकी देत असेल तर…, राष्ट्रवादी आक्रमक; मिटकरी यांनी दिला थेट इशाराच