महाराष्ट्र हे लुटीचं राज, जास्त काळ…; भाजपवर ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे गटाचे खासदार संदय राऊत यांनी मोदी यांच्यासह भाजपवर टीका करताना, भाजप आर्मीचा पराभव कर्नाटकच्या जनतेने केला. म्हणजे हुकूमशाहीचा पराभव सामान्य जनता करू शकते हे पुन्हा एकदा दिसून आल्याचं ते म्हणाले.
मुंबई : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने आपला दणदणीत विजय साजरा केला. त्यानंतर भाजपच्या या दारून पराभवाचे खापर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर फोडलं आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी यांच्यासह भाजपवर टीका करताना, भाजप आर्मीचा पराभव कर्नाटकच्या जनतेने केला. म्हणजे हुकूमशाहीचा पराभव सामान्य जनता करू शकते हे पुन्हा एकदा दिसून आल्याचं ते म्हणाले. त्याचवोळी त्यांनी 1978 ची इंदिरा गांधी यांची आठवण सांगत त्यावेळी जनतेनं त्यांनाही असंच नाकारलं होतं. याचीच सुरूवात आता पुन्हा एकदा झाली आहे. कर्नाटक तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है त्यापेक्षा कर्नाटक तो झाकी है पुरा देश अभी बाकी है असंच काहीसं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही 2024 ची तयारी करत आहोत असेही ते म्हणाले. त्याचबरोबर भाजप घणाघात करताना, महाराष्ट्र तर हे भाजपने लुटलेलं राज्य आहे. हे लुटीच राज्य भाजपकडे जास्त का टिकणार नाही असेही ते म्हणालेत.