राऊत यांच्या ‘त्या’ टीकेवर शिवसेना नेत्याचा पलटवार; म्हणाले, त्यांच्यात पांढऱ्या काविळीचा दोष
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करताना, त्यांनी सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटलं आहे.
पंढरपूर : कर्नाटकमधील निवडणूक आणि प्रचारावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. तसेच तसेच शिंदे सरकारचा उल्लेख मिंधे सरकार असा उल्लेख करत महाराष्ट्रातील जनता शिंदे-फडणवीसांना माफ करणार नाही असं म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करताना, त्यांनी सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटलं आहे. त्यावरून शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी पलटवार केला आहे. त्यांनी काविळीचे तीन प्रकार आहेत. एक वरची कावीळ, एक पोटात गेलेली पांढरी कावीळ, आणि तिसरी शिंदे-फडणवीस नावाची. जी राऊत यांना झाली आहे. त्यामुळे त्यांना शिंदे-फडणवीस यांच्याशिवाय काही दुसरे दिसत नाही. आज पक्षीय पातळीवर चाललेल्या ह्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून आणि ते मित्रपक्ष म्हणून फडणवीस आणि शिंदे प्रचाराला जाणं हे योग्यच आहे. मराठी माणसाचा मुद्दा हा महाराष्ट्र एकीकरण चा मुद्दा आहे. त्यामुळे तो सार्वत्रीक निवडणुकीचा मुद्दा होत नाही.