खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन लोटस’ झालं, दैनिक ‘सामना’तून शिवसेनेनं भाजपला डिवचलं
कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर ठाकरे गटाने राहुल गांधीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर मोदी-शहांच्याच टाळक्यात बजरंगबलीने गदा हाणली. तर विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली.
मुंबई : कर्नाटकातील भाजपच्या पराभवावरून ठाकरे गटाच्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेसने मुसंडी मारल्यानंतर ठाकरे गटाने राहुल गांधीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर मोदी-शहांच्याच टाळक्यात बजरंगबलीने गदा हाणली. तर विजयी गदा राहुल गांधींच्या खांद्यावर ठेवली असं म्हणत दैनिक ‘सामना’तून भाजपला शिवसेनेनं डिवचलं आहे. याचबरोबर ‘भारतातील सामान्य जनता हुकूमशाहीचा पराभव घडवू शकते, हा कर्नाटकच्या निकालाने दिलेला धडा आहे. कर्नाटकची जनता शहाणी आहे. हाच शहाणपणाचा संदेश आता देशभरात गेल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकात खऱ्या अर्थाने भाजपचेच ‘ऑपरेशन लोटस’ झाले आहे, अशीही टीकाही करण्यात आली.
Published on: May 15, 2023 09:35 AM