फडणवीसांनी म्हटलं ‘मी पुन्हा येईन’, वेगवेगळ्या चर्चांना का आलं उधान?
फडणवीस हे बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी तालुक्यातील निट्टूर येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मुंबई : कर्नाटक निवडणुकांच्या प्रचाराचा बिगुल वाजला आहे. अनेक नेते राज्यातील नेते कर्नाटक वारीवर आहेत. त्यातच राज्यात राष्ट्रवादीचे नाराजीनाट्य सुरू आहे. त्यामुळे राज्यात राजकीय काहीतरी उलतापालथ होणार असा कयास अनेकांडून लावला जात होता. याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईनचा नारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस हे बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहचले. यावेळी त्यांनी तालुक्यातील निट्टूर येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तेव्हा त्यांनी मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा राज्यात नेमकं काय होणार आहे? असा सवाल अनेकांच्या मनात पडला आहे. तर सत्ता संघर्षाच्या निकालाआधी फडणवीस यांनी हे विधान केल्याने अनेकांनी गांभीर्याने घेतलं आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट