कर्नाटक सरकारची दडपशाही सुरूच, ‘या’ खासदारांना केली जिल्हाबंदी
कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणावर सीमावासीय भागातील मराठी बांधवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. येथील मराठी बांधवानी संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील खासदार यांना निमंत्रण दिले होते. पण, कर्नाटक सरकारने जिल्हाबंदीचे आदेश काढून त्या खासदारांना बेळगावात येण्यापासून रोखलं आहे. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमधील मराठी बांधवानी हुतात्मा दिनी अभिवादनासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. […]
कोल्हापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणावर सीमावासीय भागातील मराठी बांधवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. येथील मराठी बांधवानी संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातील खासदार यांना निमंत्रण दिले होते. पण, कर्नाटक सरकारने जिल्हाबंदीचे आदेश काढून त्या खासदारांना बेळगावात येण्यापासून रोखलं आहे.
शिवसेना खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमधील मराठी बांधवानी हुतात्मा दिनी अभिवादनासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, बेळगाव जिव्हा प्रशासनाने खासदार माने यांना जिल्हा प्रवेश बंदीचे आदेश जारी केले आहेत.
रात्री उशिरा बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशामुळे कर्नाटक सरकारची दडपशाही अद्याप सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
Published on: Jan 17, 2023 10:26 AM